भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें जेथें मन जाय

jethen jethen man jay

रचनाकार: संत कान्हो · अभंग
जेथें जेथें मन जाय । तेथें नागनाथ आहे ॥१॥ म्हणवोनि पाहे । मन गुंतलें नागेश पाये ॥२॥ सुखसोहळा भोगियले । भोग भोगणें नागेश जेणें ||३|| कान्हो पाठक आनंदला । सद्गुरु नागेश भेटला ॥४॥