भजनी मालिका
← भजनांकडे परत

जरी तुज देवाची चाड । तरी न करीं बडबड

jari tuj devachi chad | tari na karin badabad

रचनाकार: संत कान्हो · अभंग
जरी तुज देवाची चाड । तरी न करीं बडबड । बहुत बोलतां वाड । पडसी पतनीं ॥१॥ जरी तुज देवाची बाधा । तरी न करी वेवादा । वाद करितां निंदा । घडती दोष ||२|| जरी तुज देवाचा छंद | तरी सांडी कामक्रोध । तेणे परमानंद | होउनी ठासी ||३|| जरी तुज देवचि व्हावा । तरी मौन धरी पा जिव्हा । जेणें तूं अनुभवा । पावसील ॥४॥ जरी तुज देवाचा सांगात । होतां अखंडित | तरी बैस पा निवांत । साधुसंगीं ||५|| जरी तुज देवाचा विश्वास | तरी हृदयीं धरी नागेश । म्हणे कान्हो पाठक। अरे जना ॥६॥