भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाय जाय राउळासी । नको येऊं आह्मांपाशीं

jay jay raulasi | nako yeun ahmampashin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जाय जाय राउळासी । नको येऊं आह्मांपाशीं ॥१॥ जाऊं आह्मी बरोबर । झाला तिचा हो चाकर ॥२॥ तिजसंगें काम करी । ऐसा जाणा देव हरी ॥३॥ चहूं हातीं धुणें केलें । जनी म्हणें बरें झालें ॥४॥