भजनी मालिका
← भजनांकडे परत

इंद्रसभे झाला बाद करूं रायासी सावध

indrasabhe jhala bad karun rayasi savadh

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
इंद्रसभे झाला बाद करूं रायासी सावध।।१।। येरीकडे ब्रह्मऋषी । कृपें वोळला शिष्यासी ॥२॥ नवी व्याली जैसी गाय पक्षी अंडजीं झेपाय||३|| बाप माझा तैशापरी होय शिष्याचा साहाकारी ॥४॥ येऊनियां मागेल तूतें । छळ करील गाधिसुत ||५|| बापा सावध अंतरी सत्त्व ढाळील नानापरी ॥६॥ घरी श्वापदांच्या झुंडी । तुझ्या देशांत भवंडी ॥७॥ मानी शब्दाला आमुच्या बना न जायें ऋषींच्या ||८|| ऐसें बोलोनी रायासी । गेला वसिष्ठ तपासी ।।९।। तुझ्या सत्त्वालागीं हानी । करूं इच्छी म्हणे जनी ॥१०॥