भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोनी श्रीकृष्णचरण हरुष घाली लोटांगण

doni shrikrushnacharan harush ghali lotangan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
दोनी श्रीकृष्णचरण हरुष घाली लोटांगण ॥१॥ म्हणे तूंचि माझ्या मना । स्वस्थ करीं गा नारायणा ॥ २ ॥ आश्रमासी येतां ऋषि तोंवरी आयुष्य प्राणासी ॥३॥ ऐकतांचि हांसे देवा न दिसे प्राप्तीचा उपाय ॥४॥ अवकाळी केर्चे अन विचारितां दिसे विघ्न॥५॥ त्यांचें असो बळ तैसें कांहीं वोपायें आम्हांस ॥६॥ स्वस्थ नव्हे माझें मन । क्षुधा लागली दारुण॥७॥ ताटीं विस्तारिला मेवा तुझा ऐकोनियां धांवा ॥८॥ न जेवितां आलों येथें। बहु झालों क्षुधाक्रांत ॥१॥ सत्वर मेळवीं भोजनी म्हणे नामयाची जनी ।।१०।।