भजनी मालिका
← भजनांकडे परत

दळण्याच्या मिषें। विठ्ठल सावकाशें

dalanyachya mishen| viththal savakashen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
दळण्याच्या मिषें। विठ्ठल सावकाशें ।।१।। देहबुद्धीचें वैरण द्वैत खडा रे निसून ।।२।। एकलीच गातां। दुजा साद उमटतां ।।३।। कोण तुझे बरोबरी। साद देतो निरंतरीं।।४।। खूण कळली नामदेवा । विठ्ठल श्रोता जनीच्या भावा ॥५॥