भजनी मालिका
← भजनांकडे परत

चारा पाणी मुसळ धारा । तेणें मोडिलें छपरा

chara pani musal dhara | tenen modilen chhapara

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
चारा पाणी मुसळ धारा । तेणें मोडिलें छपरा ।। १ ।। मग विठाई धांवली हातीं चक्र धांवत आली ॥२॥ वासे लाविले चौफेर क्षणामध्यें केलें घर ||३|| जागा झाला नामदेव द्वारीं उभे पंढरिराव ।।४।। डोयीं ठेवून पायांवरी। दासी जनी चरण चुरी ॥५॥