भजनी मालिका
← भजनांकडे परत

बघायाला गेले क्रियामण शिडी घालूनियां उडी तेथें आले

baghayala gele kriyaman shidi ghaluniyan udi tethen ale

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
बघायाला गेले क्रियामण शिडी घालूनियां उडी तेथें आले ।।१।। पुरवी या नवसा म्हणवी गा देवा । टोंचियेले जीवा गळ देहीं ।।२।। आठ चारी फेरे फिरविती त्यासी पाहती नवसासी पुरलें नाहीं ॥३॥ दुःख सुख तेथें पाहुनी प्रमाण करिती समान क्रीयमाण ||४|| दुरुनी पाहती दावी जनीं दासी म्हणे नामयासी पहावें स्वामी ॥५॥