भजनी मालिका
← भजनांकडे परत

असो थोरथोरांची मात । तूंचि मिळालासी गोपाळांत

aso thorathoranchi mat | tunchi milalasi gopalant

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
असो थोरथोरांची मात । तूंचि मिळालासी गोपाळांत ।।१।। त्यांच्या शिदोऱ्या सोडिसी ग्रासोग्रास उच्छिष्ट खासी ॥ २॥ न म्हणे सोंवळें आंवळें। प्रत्यक्षचि तें आंवळें ||३|| स्वानंदाचे डोहीं हात धुतले सर्वांही निश्चित ||४|| हातीं काठ्या पायीं जोडे। दासी जनी वाट झाडे ||५||