भजनी मालिका
← भजनांकडे परत

आषाढी एकादशी । नामा होता उपवासी

ashadhi ekadashi | nama hota upavasi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आषाढी एकादशी । नामा होता उपवासी ॥१॥ देवें गरुड धाडिला । वेगीं बालाविलें त्याला ॥२॥ राही म्हणे पांडुरंगा । कोणें बोलाविलें सांगा ॥३॥ ऐसा भक्तराज निका । दासी जनीचा आत्मसखा ॥४॥