भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं जावें कवण्या ठाया। न बोलसी पंढरीराया

amhin javen kavanya thaya| na bolasi pandhariraya

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आम्हीं जावें कवण्या ठाया। न बोलसी पंढरीराया ॥१॥ सरिता गेली सिंधूपाशीं जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥ जळ कोपलें जळचरासी माता न घे बाळकासी ॥३॥ म्हणे जनी आलें शरण जरी त्यां धरिलेंसें मौन्य ॥४॥