भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही पातकांच्या राशी आलों तुझ्या पायांपाशीं

amhi patakanchya rashi alon tujhya payampashin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आम्ही पातकांच्या राशी आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥ मना येईल तें तूं करीं आतां तारी अथवा मारीं।।२।। जनी म्हणे सृष्टीवरी एक अससी तूं वा हरी ॥३॥