भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित।।ध्रु

aika ho namayacha janma mul sanchit||dhru

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित।।ध्रु।। हिरण्यकश्यपकुळीं नामा प्रल्हाद । पद्मीणी नाम माझें श्रेष्ठ दासीचें पद।।१।। दुसरा जन्म याचा अंगद रामभक्त मंथरा नाम माझें भरतें मारिली लाथ ।।२।। द्वापारी कृष्णसेवा उद्धव जन्मला कुबज्या नाम माझें देवें उद्धार केला ॥३॥ कलींत नामदेव विठ्ठलचिंतनीं । त्याचीच सेवेलागीं दासीं जन्मली जनी ॥४॥