भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो सखीये साजणी ज्ञानाबाई हो हरणी

aho sakhiye sajani dnyanabai ho harani

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अहो सखीये साजणी ज्ञानाबाई हो हरणी॥। १॥ मज पाडसाची माय भक्ति वत्साची ते गाय ॥२॥ कां गा उशीर लाविला तुजविण शिण झाला ॥३॥ अहो बेसले दळणीं धांव पाली म्हणे जनी ॥४॥