भजनी मालिका
← भजनांकडे परत

आज्ञा करुनी सूर्यासी । तपवी द्वादश कळेसी

adnya karuni suryasi | tapavi dvadash kalesi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आज्ञा करुनी सूर्यासी । तपवी द्वादश कळेसी।।१।। बाप तपाच्या सामध्ये आज्ञा वंदिली आदित्यै॥२॥ पर्वताच्या लाह्या होती असा प्रकाशला गमस्ती||३|| रोहिदास म्हणे तात बहू झालों तृषाक्रांत ॥४॥ भाकितसे हो करुणा सत्वर मेळवीं जीवना ॥ ५॥ प्राप्त न होतां जरी तोय जीव माझा जाऊं पाहे॥६॥ बाळ कडे घेऊनियां। पैल दिसे तेथें छाया ॥७॥ उदक प्राशन करुनी पंथ क्रमूं म्हणे जनी ॥८॥