भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधीं घेतलें पदरीं । आतां न धरावें दुरी

adhin ghetalen padarin | atan na dharaven duri

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आधीं घेतलें पदरीं । आतां न धरावें दुरी ॥१॥ तुम्हां थोराचें उचितें । हेंचि काय सांगूं तूंतें॥२॥ अहो ब्रह्मियाच्या ताता । सखया लक्षुमीच्या कांता ॥३॥ दयेच्या सागरा। जनी म्हणे अमरेश्वरा॥४॥