कथेची सामग्री । देह अवसानावरी
kathechi samagri | deh avasanavari
कथेची सामग्री । देह अवसानावरी ॥१॥ नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
kathechi samagri | deh avasanavari
कथेची सामग्री । देह अवसानावरी ॥१॥ नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
kanya gau kari kathecha vikara | chandal to khara taya nanven
कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥१॥ गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥२॥
kanya sasuryasi jaye | magen paratoni pahe
कन्या सासुर्यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥ तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥
kapat kanhin ek | nenen bhulavayachen lok
कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥१॥ तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥
kab marun paun charan tumhare | thakur mere jivan pyare
कब मरूं पाऊं चरन तुम्हारे । ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥१॥ जग डरे ज्याकुं सो मोहि मीठा । मीठा दर आनंदसाहि पैठा ॥ध्रु.॥
kar katavari tulasichya mala | aisen rup dolan davin hari
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥
karanen ten deva | he chi ek pave seva
करणें तें देवा । हे चि एक पावे सेवा ॥१॥ अवघें घडे येणे सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ध्रु.॥
karanen ten hen chi kara | naraka aghora kan jatan
करणें तें हें चि करा । नरका अघोरा कां जातां ॥१॥ जयामध्यें नारायण । शुद्धपण तें एक ॥ध्रु.॥
karavitan vrat ardhe punya labhe | modavitan doghe naraka jati
करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥१॥ शुद्धबुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥
karavili taisi keli katakat | vankaden kin nit dev jane
करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥१॥ कोणाकारणें हें झालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥२॥
kara kara lagapat | dhara pandharichi vat | janv nahin chapet | ghat padila kalacha
करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ॥१॥ दुजा ऐसा नाहीं कोणी । जो या काढी भयांतूनि । करा म्हणऊनि । हा विचार ठायींचा ॥ध्रु.॥
kara narayana | majhya duhkhachi khandana
करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥१॥ वृत्ति राखा पायांपाशीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु.॥
karal ten kara | haten apulya datara
कराल तें करा । हातें आपुल्या दातारा ॥१॥ बळियाचीं आम्ही बाळें । असों निर्भर या सळे ॥ध्रु.॥
karal ten kay navhe ji viththala | chitta dyaven bola bobadiya
कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया ॥१॥ सोडवूनि घ्यावें काळचक्रा हातीं । बहुत विपत्ती भोगविल्या ॥ध्रु.॥
karava uddhar kinva ghyavi hari | eka bola sthiri rahen deva
करावा उद्धार किंवा घ्यावी हारी । एका बोला स्थिरी राहें देवा ॥१॥ निरसनें माझा होईल संदेह । अवघें चि आहे मूळ पायीं ॥ध्रु.॥
karava uddhar hen tumhan uchit | amhi keli nit kalali te
करावा उद्धार हें तुम्हां उचित । आम्ही केली नीत कळली ते ॥१॥ पाववील हाक धांवा म्हणऊन । करावें जतन ज्याचें तेणें ॥ध्रु.॥
karava kantala navhe hen uchit | adhin cha kan prit laviyeli
करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली ॥१॥ जाणतसां तुह्मीं लाघव रूपाचें । आपुलें तें जीव घेतें ऐसा ॥ध्रु.॥
karava kaivad | nahin tari ala nad
करावा कैवाड । नाहीं तरी आला नाड ॥१॥ स्मरा पंढरीचा देव । मनीं धरोनिया भाव ॥ध्रु.॥
karava varshav | trushakrant jhala jiv
करावा वर्षाव । तृषाक्रांत झाला जीव ॥१॥ पाहें आकाशाची वास । जाणता तूं जगदिश ॥ध्रु.॥
karava sankoch chittasi bhovata | hoy te bahuta sukh kije
करावा संकोच चित्तासी भोवता । होय ते बहुता सुख कीजे ॥१॥ देवाची पूजा हे भूताचें पाळण । मत्सर तो सीण बहुतांचा ॥धृ॥