भजनी मालिका
← भजनांकडे परत

करणें तें हें चि करा । नरका अघोरा कां जातां

karanen ten hen chi kara | naraka aghora kan jatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करणें तें हें चि करा । नरका अघोरा कां जातां ॥१॥ जयामध्यें नारायण । शुद्धपण तें एक ॥ध्रु.॥ शरणागतां देव राखे । येरां वाखे विघ्नाचे ॥२॥ तुका म्हणे लीन व्हावें । कळे भावें वर्म हें ॥३॥