भजनी मालिका
← भजनांकडे परत

कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें

kanya gau kari kathecha vikara | chandal to khara taya nanven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥१॥ गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥२॥ आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ॥३॥