भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी

kar katavari tulasichya mala | aisen rup dolan davin hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥ कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥ गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥ झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥ तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥