भजनी मालिका

भजने

यशोदा म्हणे हे राजभगिनी । कां पां आलिसे थांबोनी । जाईल बाळका झडपोनी । कैसे करुं हे राक्षसी ॥१॥ बहुत उपचारेंसी पूजिली । पूतना सन्मानें बैसविली । मग ते म्हणे ये यशोदे भली । पुत्रवंती झालिसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यशोदा व्याकूळ जाहालीसे प्राणें । सुखी असो तान्हें वनामाजी ॥१॥ उठती तिडका स्तनीं माझ्या फार । लवतसे नेत्र वेळोवेळां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल ॥धु०॥ साध्या गव्हांची पोळी लाटीं । मला पुरण पोळी करून दे मोठी । नाहीं अडवीत गुळासाठीं । मला जेवूं घाल ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

यशोदे भोंवल्या मिळाल्या गौळणी । सांगती गार्‍हाणी नानापरी ॥१॥ गोरस भक्षोनि फोडितो भाजन । गोकुळा सोडोनि जाऊं सये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

यशोदेचा हरी जाय यमुनातीरीं । वाजवीतो मुरली पोवा नानापरी ॥१॥ छंदे छंदे वाजे वृंदावनीं फुजें । वेधलें मन माझें नाठवें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

यशोदेसी गौळणी सांगती गार्‍हाणे । नट नाटक कपटी सांभाळ आपुले तान्हें । किती खोडी याच्या सांगु तुजकारणें ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

या देहा अमंगळा । पासुनी आत्मा वेगळा । ऐसा ज्ञानाचा डोळा । प्रत्यक्ष दिसे ॥१॥ ज्ञान म्हणजे शुद्ध सत्वगुण । जेथें द्वैत प्रकृतीचें अधिष्ठान । जी पासाव सव्वीस लक्षणें । बोलिलें षोढशाध्यायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

या पंढरीचे सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥ म्हणोनियां मन वेधलें चरणीं । आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

या परी करुनियां त्याची गती । निजधामा पाठविला श्रीपती । लोकही विस्मय पावोनि चित्तीं । न कळे म्हणती हरिलीळा ॥१॥ हाचि ईशाचाही ईश । जगाचा आदी हा जगदीश । येथें दिसतो । मानुशवेश । परि हा अध्यक्ष भुवनत्रया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

या पाउलासाठीं लक्ष्मी पिसी । सनकादिक वेडावले मानसीं ॥१॥ सुख जोडलें पुंडलिकासी । विटेवरी हृषिकेशी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

या पोटाकारणें न करावें तें करिती । वेद ते विकिती थोर याती ॥१॥ नीचासी शब्दज्ञान सांगती ब्राह्मण । ऐकती ब्रह्माज्ञान त्यांचें मुखें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

या रे करूं गाई । जमा निजलेती काई । बोभाटानें आई । घरा गेल्या मारील ॥१॥ घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणें चि मोहरे । एवढें चि पुरे । केलियानें सावध ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम