भजनी मालिका
← भजनांकडे परत

या चि हाका तुझे द्वारीं । सदा देखों ऋणकरी

ya chi haka tujhe dvarin | sada dekhon runakari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
या चि हाका तुझे द्वारीं । सदा देखों ऋणकरी ॥१॥ सदा करिसी खंड दंड । देवा बहु गा तूं लंड ॥ध्रु.॥ सुखें गोविसी भोजना । लपवूनियां आपणां ॥२॥ एकें एक बुझाविसी । तुका म्हणे ठक होसी ॥३॥