भजनी मालिका

भजने

आषाढीची यात्रा आला पर्वकाळ । निघाला संतमेळ पंढरीसी ॥१॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताई । आणिकही अनुभवी संत बहु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आष्टांग साधन मौनी जटाधारी । एक चरणावरी करती तप ॥१॥ वायु ते आहार असती दिंगबर । परि न कळे विचार देव कोठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥ पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आसन शयन भोजन गोविंदें । भरलें आनंदें त्रिभुवन ॥१॥ अवघियां केली काळें तडातोडी । अवसर घडी पुरों नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आसनीं शयनीं आठवीं अनुदिनीं । नित्य समाधानीं रूप तुझें ॥१॥ काम धाम कांहीं नलगे माझ्या चित्तीं । न देखे विश्रांति तुजविण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आसनीं शयनीं जपतां चक्रपाणि । लाविली निशाणी वैकुंठींची ॥१॥ नाहीं रे बंधन आम्हां हरिभक्तां । गीतीं गुण गातां राघोबाचि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आसनीं शयनीं भोजनीं गमनीं । तुझे पाय दोन्ही दावी मज ॥१॥ संसार कल्मष समूळ छेदिसी । दावीं अहर्निशीं पाय मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठुर अतिवादी ॥१॥ याति कुळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आहर्निशी योगी साधिती साधन । तयासी महिमान न कळेची ॥१॥ तो हा श्रीहरी बाळवेषें गोकुळीं । खेळे वनमाळी गोवाळीयांसीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आहा आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥१॥ समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा । संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आहा आहा रे भाई । नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥१॥ नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आहा आहा रे भाई । हें अन्नदानाचें सत्र । पव्हे घातली सर्वत्र । पंथीं अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचें आर्त पुरवावया ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

आहा आहारे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन ॥१॥ थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आहा रे काया जोडी केली । नर्कासी धाडिलीं उभय कुळें ॥१॥ उपजतां तुज संतोषले सर्व । बुडविलें नांव त्यांचेही त्वां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र झाला ॥१॥ गळे चि ना गर्भ नव्हे चि कां वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥ध्रु. ॥

रचनाकार: संत तुकाराम

आहाच तो मोड वाळलियामधीं । अधीराची बुद्धि तेणें न्यायें ॥१॥ म्हणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम