भजनी मालिका
← भजनांकडे परत

आसनीं शयनीं आठवीं अनुदिनीं । नित्य समाधानीं रूप तुझें

asanin shayanin athavin anudinin | nitya samadhanin rup tujhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आसनीं शयनीं आठवीं अनुदिनीं । नित्य समाधानीं रूप तुझें ॥१॥ काम धाम कांहीं नलगे माझ्या चित्तीं । न देखे विश्रांति तुजविण ॥२॥ तापत्रय ओणवा लागला चहूंकडे । न देखें उघडे तुजविण ॥३॥ तुजविण तें जिवलग दुजें कोण होईल । तें माझें निवारील उद्वेग हे ॥४॥ कृपेचा सागरू त्रिभुवनीं उदारू । न करी अव्हेरू अनाथाचा ॥५॥ नामा म्हणे केशवा आस माझी पुरवी । पाउलें दाखवी एक वेळां ॥६॥