भजनी मालिका
← भजनांकडे परत

आस पुरऊनि आस पुरवावी

as purauni as puravavi

आस पुरऊनि आस पुरवावी । ऐसी भूक मज लागों द्यावी ॥१॥ तें अनुपम्य कैसेनी सांगावे । जीवा चोरुनि भोगिजें तें जीवें ॥२॥ दृष्टि कीर होय जरि निकें । द्रष्टा हो वेडावे जयाचेनि सुखें ॥३॥ ज्ञानदेवो म्हणे करुनियां निकें । विठ्ठल परमात्मा भेटेल या फ़ावेतें ॥४॥