भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहा आहारे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन

aha ahare bhai | tayavari majhi bridavali | bhrashta ye kali kriyahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आहा आहारे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन ॥१॥ थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ध्रु.॥ बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा ॥२॥ विद्याबळें वाद सांगोनियां छळी । आणिकांसि फळी मांडोनियां ॥३॥ गांविंचिया देवा नाहीं दंडवत । ब्राम्हण अतीत घडे चि ना ॥४॥ सर्वकाळ करि संताचिया निंदा । स्वप्नीं ही गोविंदा आठवीना ॥५॥ खासचेमध्यें धन पोटासि बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं ॥६॥ तुका म्हणे नटे दावुनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावें ॥७॥