भजनी मालिका

भजने

संसारच्यातापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥ म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संसारषड‌‍चक्रीं पडिलों महाडोहीं । सोडवणें येई पांडुरंगा ॥१॥ दवडादवडी धांव दवडादवडी धांव । नको भक्तिभाव पाहों माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारसंकटें रिघालों पाठिसी । आतां झणीं देसी त्यांचे हातीं ॥१॥ ब्रीदें बडिवार ऐकोनियां फार । रिघों आम्ही द्वार विठोबाचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥१॥ हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संसारसागर भरला दुस्तर । विवेकी पोहणार विरला अंत ॥१॥ कामाचिया लाटा अंगीं आदळती । नेणों गेले किती पाहोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारसागरीं पडलों महापुरीं । सोडवण करी देवराया ॥१॥ नामाची सांगडी देऊनियां मातें । वैकुंठावरूतें नेऊनि घाली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारसिंधु हा दुस्तर । ल्लुंघवे उल्लंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥१॥ किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवती भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संसारसोहळे भोगिती सकळ । भक्तां त्याचें बळ विटोबाचें ॥१॥ भय चित्तीं धाक न मनिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संसारा आलिया उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥ देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संसारा आलिया जा रे पंढरीपुरा । पाडुरंग सोयरा पहा आधीं ॥१॥ पुरती मनोरथ इच्छिले ते सांचे । अनंत जन्माचे दोष जाती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संसारा आलिया प्राणी । तया यमाची जाचणीं । अंतीं तयासी निर्वाणी । कोणी नाहीं ॥१॥ करी नामाचें स्मरण । तेणें तुटेल बंधन । काया वाचा मनें जाण । संतां शरण जाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संसाराचा धाक घेऊनियां पोटीं । जाहला हटतटी गोसावी तो ॥१॥ पहिल्या परीस यातायाती मागें । शिणला उद्योगें भाक मागूं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संसाराचा हेत राहिला मागें । अंगसंग वेगें नोहे कांते ॥१॥ एकांती राहाती परि न लिंपे कर्मा । वाउगाचि प्रेमा वरी दावी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ