भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारदुःखें पीडिलों दातारा

sansaraduhkhen pidilon datara

रचनाकार: संत बंका · अभंग
संसारदुःखें पीडिलों दातारा । किती येरझारा जन्ममरण ॥१॥ सोडवू गा देवा भवाची काचणी । जातो आडरानी विषयसंगे ॥२॥ भवाचिया डोहीं बुडतों वेळोवेळां । कां न ये कळवळा तुज देवा ॥३॥ वंका म्हणे तुम्ही जरी मोकलिलें । कवणातें वहिलें शरण जाऊं ॥४॥