भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारा येऊनी लागले फ़ांसे

sansara yeuni lagale फ़anse

संसारा येऊनी लागले फ़ांसे । गुंतला आशा मायामोहें ॥१॥ न खंडे न तुटे कर्माची बेडी । अनुभवेंविण तोडी तो योगिया ॥२॥ कर्माची सांखळी पडली असे पायीं । गुरुमुखें खुणें उगउ पाहीं ॥३॥ ज्ञानदेवो म्हणे तुझे कृपेवीण न तुटे फ़ांसा । निवृत्तीनें कैसा उगविला ॥४॥