भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारसोहळे भोगिती सकळ । भक्तां त्याचें बळ विटोबाचें

sansarasohale bhogiti sakal | bhaktan tyachen bal vitobachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसारसोहळे भोगिती सकळ । भक्तां त्याचें बळ विटोबाचें ॥१॥ भय चित्तीं धाक न मनिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥ध्रु.॥ पापपुण्य त्यांचें धरूं न शके अंग । भक्तांसी श्रीरंग सर्वभावे ॥२॥ नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव त्यांचा भार सर्व वाहे ॥३॥ तुका म्हणे देव भक्तां वेळाईत । भक्त ते निंश्चित त्याचियानें ॥४॥