भजनी मालिका

भजने

सकळ संतजन देखोनि नयनीं । टाळिया पिटोनी गाता नाम ॥१॥ म्हणती धन्य भक्त निधडा वैष्णव । ब्रह्मादिकां माव न कळे याची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सकळ समुदाव मिळोनियां आले । द्र्व्य देउनि नेलेंज धोंडोबाशीं ॥१॥ धोंडोबाशीं सकळिके ग्रामस्थीं आणिले । पूर्ववत जाले दगडची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सकळ साधनां वरिष्ठ सार । विठ्ठल नामाचा उच्चार । आणखी नका वोरबार । शीणचि उरेल पुढती ॥१॥ धांवा म्हणोनि अवघे वेगीं । चितचि ठेवा पांडुरंगी । संसारचि तुटेल मागी । फिटेल धगी त्रिविध तापा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सकळ सुख रामनामीं आहे । परमामृत ध्याये रामनाम ॥१॥ नामें न घडे कर्म नामें होय निष्कर्म । नाम परब्रह्मा सार नाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुह्मीं ॥१॥ कर्मधर्में तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सकळा आगराचें जें मूळ । तो हा सोज्वळ विठू माझा ॥१॥ वेदांचा विचार शास्त्रांची जे गती । तोचि हा श्रीपती विठु माझा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

सकळांचिया नेत्रें तुम्हां सर्वही देखणें । सकळांचिया श्रोत्रें तुम्हां सर्वही ऐकणें ॥१॥ ऐसे सर्वज्ञची तुम्हीं सर्वदा देवा । जेथिल तेथें ज्याच्या तैशा जाण तसा भावा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सकळांची इच्छा करीतसे पूर्ण । भुलला श्रीकृष्ण त्यांच्या भावा ॥१॥ विमानीं बैसोनी सुरवर पाहाती । गंधर्द गाताती सप्त-स्वरें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव