भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळा मंगळांचे धाम

sakala mangalanche dham

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सकळा मंगळांचे धाम । ज्याचेनि विश्राम विश्रांती ॥१॥ तो हा पंढरीचा रावो । सकळां ठावो कल्याणा ॥२॥ ज्याचेनी सुखा सुखपण । ज्याचेनी त्रिभुवन रुपस ॥३॥ निळा म्हणे ज्याचेनि निगमा । आणिली गरिमा जाणिवेची ॥४॥