भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ साधनांचें सार । जनार्दन इतका उच्चार

sakal sadhananchen sar | janardan itaka uchchar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळ साधनांचें सार । जनार्दन इतका उच्चार ॥१॥ येणें घडे सर्व कर्म । नको भेदाभेद वर्म ॥२॥ सांडा द्वैताचा भाव । तेणें सर्व दिसें वाव ॥३॥ एका जनार्दनीं भाव । भाव तेथें वसें देव ॥४॥