भजनी मालिका

भजने

भोगावती तीरीं दिधला मंडप । साधू आपरूप पांडूरंग ॥१॥ रखुमाई राही वैसल्या अनेक । सखा पांडुरंग उतरला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भोगावरी आम्ही घातिला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥ नाहीं यासी पतन् न होय बंधन । नित्य हेंचि स्नान राचनामीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भोगावरी आह्मीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥ विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भोगितां काम भोगाचे सोहळे । परी अंतकाळीं कळे वर्म त्याचें ॥१॥ चालतां देह भोगातें भोगिती । अंतकाळीं होतीं दैन्यवाणे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणीगोपाळां गाईंवत्सां ॥१॥ गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

भोगी झाला त्याग । गीती गातां पांडुरंग । इंद्रियांचा लाग । आम्हांवरूनि चुकला ॥१॥ करुनि ठेविलों निश्चळ । भय नाहीं तळमळ । घेतला सकळ । अवघा भार विठ्ठलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भोगें चिताविसील नाना दुःखें । तो तूं भोगचि भोगसील सुखें ॥१॥ मीपण कैचें काये । हानी लाभ तुझा तूंचि पाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी । अन्नेएकवटा । देई निवडुनी । माते म्हणतो जननी । हात निपटून मेदिनी । वरी अंग घाली ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥१॥ मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भोरप्यानें सोंग पालटिलें वरी । बक ध्यान धरी मत्स्या जैसें ॥१॥ टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भोळा कर्पुरगौर भोळे ज्याचें मन । भोळ्या भक्ताधीन धांवेक भोळा ॥१॥ भोळे याचे गळां शोभे रुडमाळा । अर्धांगी तें बाळा पर्वताची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भोळा माझा पंढरीनाथ । धांवें त्वरित पाचारिल्या ॥१॥ न पाहे मानप्रतिष्ठा त्याची । घेतली ज्याची सुति येणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर । तेथें मी पामर काय वर्णू ॥ १ ॥ भूषण जयाचें भुवना वेगळें । रुंडमाळा खेळे गळ्यामध्यें ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी