भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोगोनी नान योनी । आलासी आतां या जनीं

bhogoni nan yoni | alasi atan ya janin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भोगोनी नान योनी । आलासी आतां या जनीं ॥१॥ ऐसा धरी मागील आठव । करी देहाचें वाटीव ॥२॥ नाहीं तरी जाशील वायां । पुनरपि यमालया ॥३॥ येतां जातां शिणतोसी । एका जनार्दनीं कां न भजसी ॥४॥