भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोगावरी आह्मीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें

bhogavari ahmin ghatala pashan | marana maran aniyelen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भोगावरी आह्मीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥ विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥ काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥२॥ केला तरी उरे वाद चि कोरडा । बळें घ्यावी पीडा स्वपनींची ॥३॥ आवघे चि वाण आले तुम्हां घरा । मजुरी मजुरा रोज कीदव ॥४॥ तुका म्हणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥५॥