भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा

bhondavaya mis gheuni santanchen | kari kutumbachen dasya sada

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥१॥ मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें ॥ध्रु.॥ तिमयाचें बैल करी शिकविलें । चित्रींचें बाहुलें गोष्टी सांगे ॥२॥ तुका म्हणे देवा जळो हे महंती । लाज नाहीं चित्ती निसुंगातें ॥३॥