भजनी मालिका

भजने

पूर्वीं तूं अनुज झालासी कनिष्ठ । सोशियेले कष्ट मज-सवें ॥१॥ आतां तूं वडील होईंगा सर्वज्ञा । पाळीन मी आज्ञा तुझी बारे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पूर्वी बहुतांचे धांवणें केलें । श्रमोनी ठेविले कर कटीं ॥१॥ भक्तांसाठीं मनमोहन धरिले जघन कर कटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पूर्वी हिरण्यकश्यपाचे कुळीं । नामा जन्मे भूमंडळीं ॥१॥ तेथें हरिभक्ति करी । तेणें तोषला नरहरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पूर्वीपासूनी ज्यांचें देणें । वाल्मीका पेणें रामनामें ॥१॥ अजामेळ पापराशी । नामेंची त्यासी उद्धार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पूर्वील कथा अनुसंधान । राहिलें होतें करितां कथन । मतिविस्ताराचे महिमान स्फुर्ती फांकोन वाहावली ॥१॥ माभळभट गेलीया वरी । कागासुर तो माव करी । येऊनियां गोकुळा भीतरी । बिंबवृक्षावरी बैसला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पूर्वीहूनि बहु भक्त सांभाळिले । नाहीं अव्हेरिले दास कोणी ॥१॥ जेजे शरण आले तेते आपंगिले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वीचि होसी । केशव न होसि अरे मना ॥१॥ आप ध्यासी तरी आपचि होसी । केशव न होसि अरे मना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पृथ्वी माजी पाहतां नाहीं म्यां देखिला । हस्तिसी उडवील ऐसा कोण्हीं ॥१॥ शोधितां शोधितां आलों पंढरीसी । तेथें ज्ञानोबासी देखियेलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पृथ्वीवरुता दुष्काळ पडला । न मिळे कोणाला धान्यकण ॥१॥ समर्थे तीं सत्व टाकिती बापुडीं । दुबळ्या तांतडीं कोण पुसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ