भजनी मालिका
← भजनांकडे परत

पृथ:कारे कर्म आचरितां

pruth:kare karma acharitan

पृथ:कारे कर्म आचरितां । विधि जिज्ञाशीं काय सत्ता । अष्टादश पुराणें नानामतें आचरतां । परि तयासी विधि विवेक न कळे तत्त्वता । कर्म कळा जयाची वाचा उच्चारिता । ऐशी नाना द्वंद्वें उपाधिकें जल्पती परि एकही नेणे तेथींची वार्ता रया ॥१॥ ऐशी भ्रांती साम्य बोलती सकळे । परि नकळे नकळे पूर्ण सत्ता रया ॥२॥ निजब्रह्म बुध्दि नेणसी । गव्हारा वाउगा का शिणशी । या साठीं भ्रमुनिया बरळशी । पहिलें नव्हे तुजसंकल्पें करिशी । नाना गोष्ठी रया ॥३॥ आतां अथातो धर्मजिज्ञासा ब्रह्म जिज्ञासिक वचन । हें तंव वेदीचें प्रमाण । तरी वेदे जें वदवितें नकळे वेद कळा लय लक्ष धारण । पूजा समाधीचेनि यज्ञ यागादिके कर्मे । जपतप अनुष्ठान नाना उपासना मंत्रयंत्रादि साधनें । धांडोळितां परि ते एकही न घडे ब्रह्म जिज्ञासिक वचन । येणें सुखासाठीं बापा होशी पै हिंपुष्टी स्वानंद जीवन सुख आहे अन रया ॥४॥ नाना अर्थवाद उपाधि शब्दज्ञानें तेणें । केविं शुध्द होती याचीं मनें । नाना मुद्रा संकल्पाचिया वाढविंता तेणें । केंवि पाविजे ब्रह्मस्त्रानें । मी ब्रह्म ऐसें शब्दें वाखाणु जाशी तरी तेणे । ब्रह्म ऐसें केंवि होणें । ब्रह्माहमस्मि बोध वाचे उच्चारितां हेहीं अहंकाराचें लेणें । आतां परतें सकळही वाव जाणोनिया कांही आपलें स्वहित करणे । बापरखुमादेवीवर विठ्ठल चिंतिता निजसुखाशीं येऊं नेदी उणें ॥५॥