भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वीं पूर्वजाची गती । हेची आइकिली होती

purvin purvajachi gati | hechi aikili hoti

पूर्वीं पूर्वजाची गती । हेची आइकिली होती । सेवे लावुनी श्रीपती । निश्चिंती केली तयांची ॥१॥ कां रे पाठी लागलासी । ऐसा सांग हृषीकेशी । अद्यापवरी न राहासी । अंत पाहासी किती म्हूण ॥२॥ जन्माजन्मांतरीं दावा । आम्हां आपणां केशवा । निमित्य चालवा । काईसयास्तव हें ॥३॥ तुकयाबंधु म्हणे अदेखणा । किती होसी नारायणा । देखों सकवेना । खातयासी न खात्या ॥४॥