भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वी बहुतांचे धांवणें केलें । श्रमोनी ठेविले कर कटीं

purvi bahutanche dhanvanen kelen | shramoni thevile kar katin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूर्वी बहुतांचे धांवणें केलें । श्रमोनी ठेविले कर कटीं ॥१॥ भक्तांसाठीं मनमोहन धरिले जघन कर कटीं ॥२॥ भाविकांची इच्छा मनीं । उभा धरुनी कर कटीं ॥३॥ एका जनार्दनीं ध्यान । सांवळें ठेवून कर कटीं ॥४॥