भजनी मालिका

भजने

पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥ तेथें काय मी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पंचभूतांचिये सांपडलों संदीं । घातलोंसे बंदीं अहंकारें॥१॥ आपल्या आपण बांधविला गळा । नेणें चि निराळा असतां ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पंचभूतांचें हें शरीर खरें । निर्माणक तें बरें केलें देवें ॥१॥ पृथ्वी आप तेज वायु हें आकाश । यांचा हा सौरस आत्माराम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पंचभूतें नव्हतीं जईं । तैं वृक्ष देखिला भाई । अधोभागीं शेंडा मूळ पाहीं । वरी वेंधली तिसी पाय नाहीं ॥१॥ सांगें तूं आमुचें कोडें कान्होबा सांग तूं आमुचें कोडें । नाहीं तरी जाऊं नको पुढें ॥धृ०॥

रचनाकार: संत एकनाथ

पंचविसावा श्रीविठ्ठलु । चौविसांवेगळा तयाचा खेळू गे माय ॥१॥ तो पुंडलीका कारणें येथवरी आला । उभा उगा ठेला विटेवरी गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पंचशतामाजी दोघी पतिव्रता । जारणी सर्वथा सर्व कांहीं ॥१॥ करुनियां ऐसीं जाती नरकासी । नांडिलें पतीसी त्यांच्या पापें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥ तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

पंचाननें मज घेतलें वेढुन । नेताती काढुन प्राण माझें ॥१॥ गजेंद्राकारणें त्वांघातलीं उडी । तैसा लडसवडीं धांवे देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पटपट सांवली खेळूं या रे । सावध गड्यांनो कां वेळू लावा रे । भीड तया सोडोनी सहा गडी मारुं या रे ॥१॥ निजानंदी खेळोनी मित्रतनया हारुं या रे ॥धृ ॥

रचनाकार: संत एकनाथ

पट्टाची मी राणी वडील मानाची । जे गति मृगाची तेचि मज ॥१॥ जाईन सांगातें न सोडीं संगती । निश्चय हा चित्तीं दृढ केला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पट्टे ढाळूं आम्ही विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥१॥ निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम