भजनी मालिका
← भजनांकडे परत

पट्टे ढाळूं आम्ही विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य

patte dhalun amhi vishnudas jagin | lagon nedun angin papapunya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पट्टे ढाळूं आम्ही विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥१॥ निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥ बळिवंत जेणें रचिलें सकळ । आम्हां त्याचें बळ अंकितांसी ॥२॥ तुका म्हणे आम्ही देखत चि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥३॥