भजनी मालिका
← भजनांकडे परत

पटपट सांवली खेळूं या रे । सावध गड्यांनो कां वेळू लावा रे । भीड तया सोडोनी सहा गडी मारुं या रे

patapat sanvali khelun ya re | savadh gadyanno kan velu lava re | bhid taya sodoni saha gadi marun ya re

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पटपट सांवली खेळूं या रे । सावध गड्यांनो कां वेळू लावा रे । भीड तया सोडोनी सहा गडी मारुं या रे ॥१॥ निजानंदी खेळोनी मित्रतनया हारुं या रे ॥धृ ॥ अवघे गडी एकवटोनी जाऊं दे या रे । बहु कष्टे फेरे फिरतां मन तेथें लावा रे ॥२॥ एका जनार्दनीं खेळतां ब्रह्मारुप काया रे । जेथें पाहे तेथें दिसे जनार्दनीं छाया रे ॥३॥