भजनी मालिका
← भजनांकडे परत

पट्टाची मी राणी वडील मानाची । जे गति मृगाची तेचि मज

pattachi mi rani vadil manachi | je gati mrugachi techi maj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पट्टाची मी राणी वडील मानाची । जे गति मृगाची तेचि मज ॥१॥ जाईन सांगातें न सोडीं संगती । निश्चय हा चित्तीं दृढ केला ॥२॥ तुझीं बाळें घरीं कष्टती क्षुधेनें । जाईं वेगीं स्तनें पान देईं ॥३॥ बाळांकडे जाईं पाहें कंठीं काळ । न करीं उतावीळ मन आतां ॥४॥ नामा ह्मणे ऐसें संवादले फार । तिघांचें अंतर एकविध ॥५॥