भजनी मालिका

भजने

अहं सोहं कोहं सांडोनियां देई । निवृत्तीचे पायीं बुडी देखा ॥१॥ अकार उकार मकार निर्धार । सर्व चराचर निवृत्तिरुप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अहं सोहं वृक्षा तो निघाला वोहं । याचा शेंडा नाहीं मा कोठें कोहं ॥१॥ कान्होबा उघद माझें कोडें । बोल बोलती साबडे । अर्थ करे कां रे निवाडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अहंकार पोटींचे उतरिले जहर । केला उपकार जगामाजीं ॥१॥ कामक्रोध उतें उतरिले दंभ । करपले कोंभ संशयाचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अहंकारें आथिलें ऐसें जें शरीर । तें जाणा मंदिर चांडाळाचें ॥१॥ आपुलिया मुखें सांगे पंढरिनाथ । नव्हेचि तो भक्त सत्य जाणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अहर्निशीं कंस बसे चिंताक्रांत । विचार पुसत प्रधा-नासी ॥१॥ प्रतिज्ञा करूनि शत्रुवधा जाती । ते मागें न येती पर-तोनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अहर्निशी ध्यान शंकर धरींज्याचेंआ । तो श्रीराम वाचे कां रे नाठविसी ॥१॥ रामनाम म्हणतां तुटेल बंधन । होईल खंडन कर्माकर्मी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥१॥ रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अहा गे पापिष्टे भजन भंगिलें । ताडनालागीं घेतलें काष्ठ हातीं ॥१॥ नेणवेची बाळ आपण तुडविलें । भजनाचें वाटलें दु:ख मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अहा रे अभाग्या काय केलें । फुकट नरदेह गामविलें ॥१॥ भजें भजें रामकृष्ण वासुदेव । वाउगा सांडोनी देई हेवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अहा रे पामरा मीपण फुगारा । व्यर्थ कां रे भारा वागविसी ॥१॥ शस्त्राचेनि रोम चक्र नोहे अंगा । तया सहस्त्र भगा जाहले देखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अहा रे मुढा अहा रे मूढा । जन्मोनी दगडा काय केलें ॥१॥ साठी घाटी करसी संसाराचा छंद । वाचे तो गोविंद नुच्चारिसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अहिरावणे राम धरुनियां नेला थोर मांडिले निर्वाण । घायातळीं राम उभा करुनियां म्हणतसे करीं रे स्मरण ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

अहो करुणाकरा पतितपावना । आमुच्या वचना चित्त द्यावें ॥१॥ दिन मी हीन रंकाहुनी रंक । म्हणोनियां देह शरण तुम्हां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अहो करुणाकरा रुक्मिणीच्या वरा । उदारा धीरा पांडुरंगा ॥१॥ काय म्यां पामरें वानावें जाणावें । न कळे कैसें गावें नाम तुमचें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा