भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहंकार पोटींचे उतरिले जहर । केला उपकार जगामाजीं

ahankar potinche utarile jahar | kela upakar jagamajin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अहंकार पोटींचे उतरिले जहर । केला उपकार जगामाजीं ॥१॥ कामक्रोध उतें उतरिले दंभ । करपले कोंभ संशयाचे ॥२॥ विकल्पाचे पायीं घातियेली बेडी । केली ताडातोडी इंद्रियांची ॥३॥ स्वर्गादिक सुखें कमाविली रोकडीं । वैकुंठासी शिडी लावियेली ॥४॥ नामा म्हणे धन्य उभारिल्या ध्वजा । घातयेल्या शेजा सुखाधामीं ॥५॥