भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहं सोहं कोहं सांडोनियां देई । निवृत्तीचे पायीं बुडी देखा

ahan sohan kohan sandoniyan dei | nivruttiche payin budi dekha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहं सोहं कोहं सांडोनियां देई । निवृत्तीचे पायीं बुडी देखा ॥१॥ अकार उकार मकार निर्धार । सर्व चराचर निवृत्तिरुप ॥२॥ स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण । तें निवृत्तिनाम जाण सत्य होय ॥३॥ शुध्द बुध्द नाम निवृत्तीचे वाचे । एका जनार्दनीं साचें स्मरे मनीं ॥४॥