भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहंते न पाहे नाहीं तेची पाहे

ahante na pahe nahin techi pahe

अहंते न पाहे नाहीं तेची पाहे । भुलिसवें जाय काय करुं ॥१॥ सोहंभावें सोकरी कोहं भावें हो जरी । पाहे दुरीच्या दुरी एकतत्त्वीं ॥२॥ आदि हें माजिठें रुपीं रुप पैठें । असोनियां द्रष्टे न पाहे भुली ॥३॥ बापरखुमादेविवर भुलिभुररेंहरि । माजिठा श्रीहरि आपरुपें ॥४॥