भजनी मालिका

भजने

न लगती कथा व्युत्पत्ति उलथा । वाउग्या चळथा ग्रंथाचिया ॥१॥ हरि हरि भजन जनीं जनार्दन । सर्वत्रीम समान भूतदया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

न लगे करा खटपट । धरा पंढरीची वाट । विठ्ठलीं बोभाट । अठ्ठहास्य करावा ॥१॥ धरा संतांचा समागम । मुखीं उच्चारा रे नाम । जाते क्रोध आणि काम । दिगंतरीं पळोनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न लगे न लगे जीवाचा तो नाश । नाम गांता उल्हास माना चित्तीं ॥१॥ पंचाग्नि साधन नको धूम्रपान । योगयाग तपन नको कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न लगो विषय गोपांच्या पाठीं । न संडु स्वत्मा घोंगडें काठी । विषयभोगें होईल तुटी । कृष्ण जगजेठी अंतरे ॥१॥ म्हणवोनि हुंबली बोधाची । कृष्णेची आमुची ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

न वर्णवे जन्ममरणाचें दु:ख । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥१॥ कुरळिया केश भाळीं शोभे टिळक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

न वाटें हें सांगतां खरें । न येतां बरें स्वानुभवा ॥१॥ बुध्दि मलीन झाली कामें । संसारभ्रमें मन वेडें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

न विचारितां बळि घातला पाताळीं । सवेंचि कणव उपजली तये वेळीं । द्वार न संडिसि कवणेकाळीं । ऐसी तुझी करणी दातारा ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

न विसंबे त्या घटिकां पळ । त्याचिपाशीं सर्वकाळ ॥१॥ उत्तीर्णत्वालागीं हरि । त्याची परिचर्या करी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

न सांडाल तुम्ही आपल्या विहिता । परी मी करितों चिंता मूर्खपणें ॥१॥ रवि केवीं सांडीं आपला प्रकाश । अमृता मिठांश जीवविता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

न सांपडे हाती वाउगी तळमळ । म्हणोनि विव्हळ गोपी होती ॥१॥ बैसती समस्ता धरु म्हणोनि धावे । तंव तो नेणवें हातालागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ